तोंडाला मास्क बांधून भाजप-तृणमुलचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांचा लाठीचार्ज

412
w-bengal-fight

पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमुलचे कार्यकर्ते पुन्हा एकदा भिडले आहेत. मात्र यावेळी हाणामारीमागे कौटुंबिकवादाचे कारण असल्याचे समोर येत आहे. प. बंगालच्या हावडा येथे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी हाणामारी झाली की जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना अखेर लाठीचार्ज करावा लागला.

गुरुवारी कौटुंबिकवादाला राजकीय किनार असल्याने प. बंगालच्या हावडामध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. तोंडाला मास्क लावून परिस्थितीचं गांभिर्य विसरून हाणामारी सुरू होती. परिस्थित हाताबाहेर जाऊ नये म्हणून अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या