
अजिंक्य रहाणेची खराब फॉर्म आयपीएलमध्ये कायम राहिली असून आता त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. सलामीवीर म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू असा नकोसा विक्रम रहाणेच्या नावावर गेला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात तो केवळ दोन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. यापूर्वी गुजरातविरुद्धच्या सामन्यात तो ‘गोल्डन डक’वर माघारी परतला होता.
या सततच्या अपयशामुळे रहाणेच्या नावावर आता 12 वेळा ‘डक’ नोंदले गेले असून आयपीएल इतिहासात सलामीवीर म्हणून हा सर्वाधिक आकडा ठरला आहे. पार्थिव पटेलच्या नावावर 10 वेळा ‘डक’ची नोंद आहे.


























































