दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना साश्रू नयनांनी दिला अंतिम निरोप, हजोरोंची उपस्थिती

balu-dhanorkar

चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना हजारो कार्यकर्ते नेते व नागरिकांच्या उपस्थितीत अंतिम निरोप देण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव वरोरा येथील मोक्षधाम येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या निवासस्थानाहून निघालेल्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते.

मोक्षधाम येथे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी खासदार नरेश पुगलीया, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते नेते उपस्थित होते. बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. बाळूभाऊ अमर रहे च्या घोषणा सुरू होत्या. यावेळी संपूर्ण वातावरण शोकाकुल झाले होते.