अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ट्विटनंतर हिंदू पूजाऱ्यावर हल्ला

61

सामना ऑनालाईन । न्यूयॉर्क

न्यूयॉर्कमध्ये एका हिंदू पूजाऱ्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. स्वामी हरिश्र्चंद्र पुरी हे सकाळच्या वेळीस न्यूयॉर्कच्या फ्लोरल पार्क परिसरातील मंदिरालगतच्या रस्त्यावर धार्मिक वस्त्रे घालून जात होते. तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर मागून हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात स्वामी जबर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी 52 वर्षीय सर्जिओ या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्वामींना मारहाण करताना आरोपी ही जागा माझी आहे असे ओरडत होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेच्या एक दिवसपूर्वी डेमोक्रेटिक काँग्रेसच्या चार मुस्लिम महिला खासदारांना जिथून आले तिथे निघून जा असे ट्विटरवर म्हटले होते. ट्रम्प म्हणाले की, ‘आमचा देश स्वतंत्र, सुंदर आणि अत्यंत यशस्वी आहे. जर तुम्ही आमच्या देशाचा द्वेष केला किंवा तुम्ही येथे आनंदी नसाल तर तुम्ही हा देश सोडून जाऊ शकता.’ त्यामुळे हे ट्वीट वाचल्यानंतर प्रेरित होऊन हल्लेखोराने या हिंदू पूजाऱ्यावर हा हल्ला केल्याचा संशय वर्तवला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या