
राजस्थानच्या अजमेरमधील पुष्कर येथे पशूमेळा सुरू झाला आहे. या ठिकाणी पंजाब, हरयाणासह देशाच्या कानाकोपऱयांतून नामांकित घोडे आले आहेत. या पशू मेळाव्यात सर्वात जास्त आकर्षणाचा पेंद्रबिंदू शाबाज नावाचा घोडा ठरला आहे. या घोडय़ाची किंमत तब्बल 15 कोटी रुपये आहे. हा घोडा खूपच देखणा आणि नावाजलेला असून या घोडय़ाने आतापर्यंत वेगवेगळे सहा शो जिंकले आहेत. पुष्कर मेळ्यात बादल नावाचा 5 वर्षांचा घोडादेखील आहे. त्याची किंमतसुद्धा तब्बल 11 कोटी रुपये आहे.

























































