‘ए परफेक्‍ट प्‍लॅनेट’ – पृथ्‍वीच्‍या शक्तिशाली समूहांवर आधारित अत्‍यंत खास कार्यक्रम

सर डेव्हिड एटेनबरो यांचे कथाकथन असलेला शो ‘ए परफेक्‍ट प्‍लॅनेट’ निसर्गशक्‍ती समन्‍वयाने काम करत कशाप्रकारे आपल्‍या पृथ्‍वीला परिपूर्ण ठेवते याबाबत माहिती सांगतो. या निसर्गशक्‍ती आहेत ज्‍वालामुखी, सौरऊर्जा, हवामान व महासागरांचा सध्‍याचा आकार आणि पृथ्‍वीवरील साहाय्यभूत जीवन.

यामुळेच पृथ्‍वी हा जीवन असलेला एकमेव ग्रह आहे. पण, हे कसे घडते? आपल्‍या नैसर्गिक विश्‍वाचे वैविध्‍यपूर्ण पैलू आणि ते कशाप्रकारे एकमेकांशी संलग्‍न होत जीवन निर्माण करतात याचा उलगडा करत सोनी बीबीसी अर्थ 8 मार्च 2021 रोजी एक खास उल्‍लेखनीय सिरीज ‘ए परफेक्‍ट प्‍लॅनेट’ सादर करत आहे.

31 देश, 6 खंड आणि 1 विश्‍वामध्‍ये शूटिंग करण्‍यात आलेली ही पाच भागांची सिरीज निसर्गाचे घटक कशाप्रकारे जगभरातील वैविध्‍यपूर्ण वन्‍यजीवांचे संगोपन करतात, त्‍यांना आकार देतात व त्‍यांचे पोषण करतात याबाबत माहिती सांगते. पहिल्‍या टप्‍प्‍यातील एपिसोड्स ज्‍वालामुखी, सूर्यप्रकाश, हवामान व महासागरांच्‍या शक्‍तीला सादर करतात, तर अंतिम एपिसोड जगातील निसर्गाची नवीन शक्‍ती म्‍हणजेच मानवांच्‍या नाट्यमय परिणामाबाबत आणि परिपूर्ण संतुलनासाठी आपल्‍याला प्राणी व पर्यावरणासोबत कायम राखाव्या लागणाऱ्या समतोलाबाबत सांगतो.

सर डेव्हिड एटेनबरो यांचा लक्षवेधक आवाज आणि पुरस्‍कार-प्राप्‍त संगीतकार इलान एश्‍केरी यांचे संगीत असलेला शो ‘ए परफेक्‍ट प्‍लॅनेट’ आपल्‍या विश्‍वाकडे पाहण्‍याच्‍या आपल्‍या दृष्टिकोनाला पुनर्परिभाषित करेल आणि आपल्‍याला आकर्षक व्हिज्‍युअल प्रवासावर घेऊन जाईल.

या कार्यक्रमाबाबत बोलताना सर डेव्हिड एटेनबरो म्‍हणतात की, ”महासागर, सूर्यप्रकाश, हवामान व ज्‍वालामुखी हा शक्तिशाली, पण नाजूक समूह एकत्रितपणे जीवनाला वैविध्‍यरित्‍या आकार देतो. ते पृथ्‍वीला अद्वितीयरित्या – ए परफेक्‍ट प्‍लॅनेट बनवतात. आपली पृथ्‍वी अब्‍जोंपैकी एक आहे, विश्‍व जीवनासह पुढे सरकत आहे. पण आता, नवीन प्रभुत्‍व शक्‍ती पृथ्‍वीचा चेहरा बदलत आहे आणि ती शक्‍ती म्‍हणजे मानव. आपल्‍या परिपूर्ण पृथ्‍वीचे संवर्धन करण्‍यासाठी आपण चांगल्‍यासाठी समूह बनण्‍याची गरज आहे.” ‘ए परफेक्‍ट प्‍लॅनेट’ 8 मार्चपासून रात्री 9 वाजता इंग्रजी, हिंदी, तमिळ व तेलुगुमध्‍ये फक्‍त सोनी बीबीसी अर्थवर सुरू होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या