
घाटकोपर येथे आज सकाळी अपघाताची घटना घडली. कार वेगात असताना चालक महिलेचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार फुटपाथवर चढली आणि तेथे उभ्या एका व्यक्तीला कारने धडक दिली. यात ती पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अपघात करणाऱ्या चालक महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
महिलेने मद्य प्राशन केले होते का ते मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही. घाटकोपर पश्चिमेकडील एलबीएस मार्गावर असलेल्या एक्सेल आर्पेड इमारतीसमोर आज सकाळी सवा सहा वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी महिला चालकाविरोधात गुन्हा नोंदवून तिला नोटीस बजावली आहे. तिने दारूच्या नशेत हा अपघात केला असावा असा संशय व्यक्त होत आहे.