
17 हजार दंड प्रलंबित असल्याने चारचाकी वाहन सोडवायचे असेल तर दोन हजार रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी करून ती स्विकारताना उपनिरीक्षक रंगेहात परडण्यात आले. फ्रान्सिस रेगो असे त्यांचे नाव असून ते सहार वाहतूक विभागात कार्यरत होते.
जांलिदर (नाव बदललेले) यांची दोन चारचाकी वाहने असून ती ओला कंपनीत कामासाठी लावले आहेत. त्यापैकी एक गाडी जालिंदर स्वतः चालवतात तर दुसर्या वाहनावर चालक ठेवला आहे. शुक्रवारी दुसर्या वाहनावरील चालकाने जालिंदर यांना संपर्क केला व त्यांची गाडी अंधेरी पुर्वेकडील बिस्लरी जंक्शन येथे सहार वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गाडीवर 17 हजार रुपयांचा दंड असून तरी देखील गाडी सोडवायची असेल तर उपनिरीक्षक रेगो हे दोन हजार रुपयांची मागणी करीत असल्याचे चालकाने सांगितले. जालिंदर यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. त्यानुसार अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने तक्राररीची खातरजमा करून उपनिरीक्षक फ्रान्सिस रेगो यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.




























































