धम्माल, मस्ती, गेम, स्पर्धा आणि श्वान, मांजरांना ‘सुरक्षा कवच’! 15 ऑगस्टला भायखळ्यात अनोखा उपक्रम

धम्माल, मस्ती, गेम आणि स्पर्धा यांचा समावेश असलेला रंगरंग उपक्रम श्वान आणि मांजरांसाठी भायखळ्यात 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी पुत्रे आणि मांजरींसाठी मोफत ‘रेबीज प्रतिबंधक’ व्हॅक्सिनेशनही करण्यात येणार असल्याने खऱया अर्थाने ‘सुरक्षा कवच’च मिळणार आहे. ‘पॉझ इन पार्प’ या शीर्षकाखाली होणारा हा उपक्रम द व्हेन्यू, जेठा कंपाऊंड – 2, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भायखळा पूर्व येथे होणार असून ‘गुडमॅन व्हेटकेअर प्रा. लि.’ने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

मुंबईत अनेक प्राणी-पक्षी पेमी घरात पुत्रा-मांजर पाळतात. मात्र या प्राण्यांची नेमकी काळजी कशी घ्यावी, याबाबत त्यांना पुरेशी माहिती नसते. नेमकी याच गोष्टीची दखल घेऊन ‘गुडमॅन व्हेटकेअर’ हा उपक्रम आयोजित करीत आहे. यामध्ये रेबीज प्रतिबंधक लसीकरण केल्यामुळे जीवघेण्या रेबीज आजारापासून सुरक्षाही मिळते, अशी माहिती गुडमॅन व्हेटकेअरचे डिजिटल मार्पेटिंग एक्झ्युकिटिव्ह सुधांशु परब यांनी सांगितले.

18 वर्षांपासून अखंड उपक्रम

गुडमॅन व्हेटकेअरच्या माध्यमातून गेल्या तब्बल 18 वर्षांपासून 15 ऑगस्ट रोजी हा उपक्रम आयोजित केला जात आहे. यावेळी किमान एक ते दोन हजार श्वान, मांजरे यांना लसीकरण करण्यात येते. गतवर्षीदेखील 15 ऑगस्ट रोजी मुंबई व्हेटरनरी कॉलेज, परळ येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 1108 पुत्रे-मांजरांना लसीकरण करण्यात आले. कंपनीकडून शिवडी येथून पेट मेडिसिन, खाद्याचा पुरवठाही केला जातो.

उपक्रमात सहभागी होण्यासाठी ‘पॉझ इन पार्प 2024’ या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. शिवाय ‘ऑन द स्पॉट’ रजिस्ट्रेशनची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हा उपक्रम होणार आहे.