बेपत्ता महिला तीन दिवसांनी अजगराच्या पोटात सापडली; इंडोनेशियातील धक्कादायक घटना

इंडोनेशियात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला अजगराने संपूर्ण गिळून टाकले. गावकऱयांनी अजगराचे पोट कापून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. ही महिला तीन दिवस बेपत्ता होती.

इंडोनेशियाच्या दक्षिण सुलावेसी प्रांतातील कालेमपांग गावात ही दुर्दैवी घटना घडली. मृत महिलेचे नाव फरिदा आहे. चार मुलांची आई फरिदा गुरुवारी रात्री बेपत्ता झाली होती. गावकऱयांनी फरिदाचा शोध सुरू केला असता त्यांना 16 फूट लांबीचा अजगर दिसला, ज्याचे पोट प्रमाणाबाहेर फुगले होते. तिथेच महिलेच्या काही वस्तू सापडल्या. त्यामुळे गावकऱयांचा संशय बळावला. त्यांनी स्थानिक अधिकाऱयांच्या मदतीने अजगराचे पोट कापायला सुरुवात केली. त्यानंतर सर्वात आधी फरिदाचे डोके दिसले. अजगराने फरिदाला संपूर्ण गिळले होते.