आधार कार्डवरील पत्ता बदलणे आता आणखी सोपे

1319

बँक खाते खोलायचे असो वा अन्य कोणत्याही कामासाठी आधार कार्ड महत्त्वाचेच असते. ते आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपला पत्ता दुसरा असतो, पण त्यानंतर काही वर्षांत आपण घर बदलतो. तेव्हा आधार कार्डवरील राहता पत्ता मात्र तसाच राहातो. तो बदलायचा म्हणजे मोठे जिकीरीचे काम… असे मनात म्हणत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आधार कार्डवरील पत्ता बदलणे आता आणखी सोपे झाले आहे.

केंद्र सरकारने आधार कार्डवरील पत्ता बदलण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी केली आहे. याबाबतच्या नियमावलीमध्ये केंद्राने बदल केले असून त्याद्वारे आता केवळ सेल्फ डिक्लरेशन देऊनही आधार कार्डवरील पत्ता आपल्याला बदलता येणार आहे. ऍड्रेस प्रुफसाठी ठरावीक कागदपत्रे देण्याऐवजी आता केवळ एक सेल्फ डिक्लरेशन दिले की काम होऊ शकणार आहे. यापूर्वी आधार कार्डवरील पत्ता बदलायचा असेल तर रेंट ऑग्रिमेंट, इन्कम टॅक्स रिसीट वगैरे निश्चित अशी कागदपत्रे द्यावी लागत होती. मात्र आता ती झंझट उरलेली नाही. आधार कार्डवरील आपला पत्ता बदलायचा असेल तर आधार केंद्रात जाऊन सेल्फ डिक्लरेशनच्या फॉर्मसहीत आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या