
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे राज्यव्यापी ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा 2026’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवकांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याचे, महाराष्ट्राच्या भवितव्याविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आणि सार्वजनिक जीवनात नेतृत्वाची पहिली पायरी गाठण्याचे हे भव्य व्यासपीठ ठरणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा 7 जूनला, विभागीय फेरी 10 जूनला तर राज्यस्तरीय अंतिम फेरी 14 जूनला पार पडणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आपले विचार मांडण्यासाठी 7 मिनिटांचा वेळ दिला जाईल. 18 ते 35 वयोगटातील युवक-युवतींसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रभरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी जिल्हास्तरीय फेरी आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय फेरीतून निवडलेले स्पर्धक राज्यातील 8 विभागीय केंद्रामध्ये विभागीय फेरीत सहभागी होतील आणि त्यानंतर सर्वोत्तम 16 युवा वक्ते राज्यस्तरीय अंतिम फेरीत महाराष्ट्रासमोरील महत्त्वाच्या विषयांवर आपले विचार मांडतील.
अशी आहे स्पर्धेची रचना
जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्ह्यातून 3 विजेते निवडले जातील. त्यानंतर विभागीय फेरीतून प्रत्येक विभागातून 2 स्पर्धक राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील, अशाप्रकारे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, पुणे, नागपूर, गडचिरोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांतील युवकांना एकाच वैचारिक मंचावर आणण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. स्पर्धेच्या विविध टप्प्यांसाठी महाराष्ट्राच्या वर्तमान आणि भविष्याशी निगडित विषयांची निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचे ठिकाण
मुंबई महानगर – मुंबई शहर : शिवसेना दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालय, चिराबाजार, मुंबई – शुभम शिंदे – 9930305075. मुंबई उपनगर : एम.आय.जी. क्रिकेट क्लब, एम.आय.जी. कॉलनी, वांद्रे (पूर्व), मुंबई. शेखर येलमकर – 8355900207. ठाणे : शिवसेना नेते राजन विचारे यांचे जनसंपर्क कार्यालय, चरई, ठाणे (पश्चिम). साई सावंत – 7738377311, सौरभ निकम – 7977284245. पालघर : शिवसेना नवघर शहर शाखा, पंचवटी नाका, वसई पश्चिम, पालघर. अतुल मोटे – 8459016997
कोकण – सिंधुदुर्ग : मराठा हॉल, कुडाळ, मंदार शिरसाट – 9405812121. रत्नागिरी : शिवसेना सचिव विनायक राऊत यांचे कार्यालय, यशोधन अपार्टमेंट, अभ्युदय नगर, रत्नागिरी. प्रसाद सावंत – 9112056156. रायगड : शिवालय कर्जत खालापूर मध्यवर्ती कार्यालय, रायगड. प्रथमेश मोरे – 9763284376.
उत्तर महाराष्ट्र – नाशिक शहर / नाशिक ग्रामीण – शिवसेना कार्यालय, शालिमार, नाशिक. राहुल ताजनपुरे – 9096113636, सागर कोकणे – 8668396206. जळगाव : महावीर क्लासेस, गणेश कॉलनी, जळगाव. विराज कावडिया – 9422222699, प्रितम शिंदे – 9405446632. धुळे : शिवसेना कार्यालय, राणी झाशी चौक, धुळे. कुणाल कानकाटे – 7798000029. नंदुरबार : प्रवक्ता अकॅडमी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, डी.आर. शाळेजवळ, लोकमान्य कॉलनी, नंदुरबार. सागर पाटील – 9764088880. अहिल्यानगर : कालिका माता मंदिर हॉल (कासार समाज) रंगार गल्ली, संगमनेर, अक्षय गुंजाळ – 7020072004
पश्चिम विदर्भ – बुलढाणा : एमस् अॅपॅडमी, पारधीबाबा मंदिर परिसर, चिखली, बुलढाणा. नंदू कऱ्हाडे – 9881288313. अमरावती : सुधीर सूर्यवंशी यांचे जनसंपर्क कार्यालय, शिवाजी कॉम्प्लेक्स, अमरावती मुख्य बस स्थानक, अमरावती. उमेश शहाणे – 8767336569 अंकुश कावडकर – 9921757180. अकोला : श्री सिदाजी महाराज सभागृह, पातूर, जिल्हा अकोला. आस्तिक चव्हाण – 8308738269, सागर रामेकर – 9075979990. यवतमाळ : पृथ्वीराज देशमुख नर्सिंग कॉलेज, यवतमाळ. समीर लेनगुळे – 7020363731, अमोल धोपेकर – 9028672231, विशाल पांडे – 8788940945, विकास ठाकरे – 9504303303 अनिकेत आडे – 7066218402. वाशिम : संजय देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालय, शेळके कॉम्प्लेक्स, टाटा चौफुली, वाशिम. झुबेर मोहनावाले – 8888403010
पूर्व विदर्भ – नागपूर : शिवसेना कार्यालय, राघव अपार्टमेंट, उमरेड रोड, नागपूर. पितांबर घोलपे – 7387877919, प्रवीण अहिरराव – 9673520578. वर्धा : बच्छराज धर्मशाळा, शास्त्री चौक, वर्धा. महेश चौधरी- 9823267240 प्रशांत सातपुते – 7507904442.चंद्रपूर : श्रमिक पत्रकार भवन, वरोरा नाका, नागपूर रोड, चंद्रपूर. विक्रांत सहारे – 7219522466 – स्वप्निल पाटील – 7620706569. गडचिरोली : तेली समाज भवन, चामोर्शी, गडचिरोली. पवन गेडाम – 9527062893, भूषण पोरटे – 8766982312 भंडारा : आदिशक्ती शितलामाता मंदिर, खामतलाव खात रोड, भंडारा, विशाल भुरे – 9579804329. गोंदिया : शिवसेना भवन, यादव चौक, गोंदिया दुर्गेश किरणापुरे – 9881361677.
मध्य मराठवाडा – छत्रपती संभाजीनगर : ‘शिवसेना भवन’ श्री शिवाई सेवा ट्रस्ट, संभाजीपेठ, छत्रपती संभाजीनगर. हनुमान शिंदे – 9615294444. जालना : विठ्ठल रुक्मिणी हॉल, जालना मंगेश गव्हाड – 9421652007 गणेश काळे – 9604814444. धाराशीव : पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशीव. राकेश सूर्यवंशी – 9850321143. बीड : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन, नगर रोड, बीड. अभिषेक दिवे – 9761491111.
दक्षिण–पूर्व मराठवाडा – नांदेड : इलाईट अॅकडमी, एसबीआय बँकजवळ, नांदेड. अॅड. अक्षय वट्टमवार – 9970795222, अॅड.यश खराटे – 9511211114. परभणी : आर.पी. हॉस्पिटल पी.एम.सी. मेडीकल कॉलेज, मनवत रोड, परभणी. नवनितराव पाचपोर – 9423442424, मकरंद कुलकर्णी – 9860918163. हिंगोली : समर्थ महाविद्यालय, आंचुळे नगर, हिंगोली. शिवा शिंदे – 8308949394 चंद्रकांत शिंदे – 9834254646. लातूर : भालचंद्र ब्लड बँक हॉल, लातूर. अॅड. राहुल मातोळकर – 9860200014.
पश्चिम महाराष्ट्र – पुणे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबाग, सणस ग्राउंड समोर, पुणे. राम थरकुडे – 9923541000, युवराज पारेख – 8805664990.सातारा : गणपती मंदिर हॉल, ओगळेवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा. मिलिंद तोडकर- 8999644640, प्रितम वंजारे – 7038840385. कोल्हापूर : शहाजी कॉलेज, दसरा चौक, कोल्हापूर. मंजित माने – 8308645252. सांगली : आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सांस्कृतिक हॉल, पलूस, सांगली. विनायक गोंदिल – 7875900909. सोलापूर : हॉटेल कमांडर, मोहोळ-पंढरपूर रोड, मोहोळ, सोलापूर. विजय गायकवाड – 7775870007.
जिल्हास्तरीय फेरी
स्पर्धकांनी खालीलपैकी एका विषयावर आपले विचार मांडायचे आहेत.
व्हिजन महाराष्ट्र 2050
राजकारण आणि समाजकारण : युवकांची भूमिका
विभागीय फेरी
विभागीय स्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांना खालीलपैकी एका विषयावर भाषण करावे लागेल –
माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी
21व्या शतकातील मराठी अस्मिता : आव्हाने आणि संधी
राज्यस्तरीय अंतिम फेरी
राज्याच्या विविध भागांतून निवड झालेले सर्वोत्तम 16 युवा वक्ते अंतिम फेरीत खालील विषयावर आपली भूमिका मांडतील –
‘महाराष्ट्र धर्म : काय जपलं पाहिजे, काय बदललं पाहिजे?’



























































