India–US Trade Deal – हिंदुस्थान-अमेरिका ट्रेड डीलवर सरकारने स्पष्टीकरण द्यावं, आदित्य ठाकरे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरून (India-US Trade Deal) आता देशातील राजकारण तापू लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या कराराच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “सरकारने या कराराबाबत देशासमोर स्पष्टीकरण द्यावे. तसेच एक अधिकृत पत्रकार परिषद घ्यावी आणि ठरवलेले (Curated) प्रश्न न घेता खऱ्या प्रश्नांना सामोरे जा.”

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत भाजप सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भाजपचे केंद्र सरकार लोकशाही, विरोधी पक्ष, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुक्त पत्रकारिता आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्यांविरुद्ध शक्ती दाखवण्यात आघाडीवर आहे. मात्र हिंदुस्थानचे सार्वभौमत्व टिकवणे, व्यापार करार करणे आणि जागतिक राजकारणात राष्ट्रीय हित जपण्याबाबत हे सरकार कमकुवत ठरले आहे.”

आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे:

हिंदुस्थान -अमेरिका व्यापार करारात नेमक्या काय अटी आहेत, हे सरकारने स्पष्ट करावे.

सरकारने या विषयावर अधिकृत पत्रकार परिषद घ्यावी. त्यात आधीच ठरवलेले (Curated) प्रश्न न घेता, पत्रकारांच्या वास्तववादी प्रश्नांना उत्तरे द्यावीत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी करताना देशाचे सार्वभौमत्व आणि हिताशी तडजोड होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.