पद्म पुरस्कार शिफारस समिती अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

1450
aaditya-thackeray-press-meet

वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या व्यक्तींची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. 26 जानेवारी रोजी घोषित होणाऱया पुरस्कारासाठी मान्यवरांच्या नावाची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे.

या समितीचे सदस्य म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती झाली आहे तर राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतील. पद्म पुरस्कार हा देशातील सर्केच्य नागरी पुरस्कारापैकी एक मानला जातो. दरवर्षी 26 जानेवारीच्या पूर्कसंध्येला हे पुरस्कार जाहीर होतात. राष्ट्रपतींचा स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र व पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या