पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवादी कुठे आहेत? चीनच्या घुसखोरीवर केंद्र सरकार अजूनही गप्प; आदित्य ठाकरे यांचा निशाणा

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्वतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केली. आणि विनंती केली. सर्वपक्षीय शिष्टमंडळामागे राजकीय हेतू आहे का? भाजपचा त्या मागे काही विचार आहे का? अशा आमच्या काही शंका होत्या. हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ देशहितासाठी आहे. आणि आम्ही देशासाठी बलिदान द्यायला तयार आहोत. देशाची एकता, अखंडता, देशाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. जे हल्ले झालेत ते पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने केलेले आहेत. हेच जगभरात सिद्ध करायचे आहे. हा दहशतवाद संपवण्यासाठी जगाने एकजूट होणं गरजेचं आहे, ही आमची भूमिका आहे, हे काल ट्विटरवरूनही आम्ही स्पष्ट केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

दुसरं महत्त्वाचं, पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवादी कुठे आहेत? कुठून आले? हे प्रश्न आम्ही देशात उपस्थित करतच राहणार आहोत. मात्र, कुठलंही राजकारण न करता जागतिक स्तरावर आम्ही सर्व एकजूट आहोत, हे आम्ही आधीच सांगितले आहे, असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.

डोसियर बनवतोय आणि खासदारांचं शिष्टमंडळ विदेशात पाठवतोय, पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत?; काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैन्यातील तिन्ही दलांचे यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांचे कौतुक अन् त्यांना सलाम आम्ही सर्वच करत आहोत. मात्र, पिक्चर अभी बाकी है, असे संरक्षणमंत्र्यांनी आणि काहीजणांनी म्हटले आहे. आम्हीही तीच वाट पाहतोय की पाकिस्तानात घुसून आपण पाकव्याप्त कश्मीर पुन्हा मिळवणे गरजेचे आहे. आणि सर्वच्या सर्व दहशतवादी तळं उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही सर्वपक्ष एकजूट आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

माझं पाकिस्तानात लग्न लावून द्या, ज्योती मल्होत्राची ISI अधिकाऱ्याकडे मागणी

चीनच्या घुसखोरीवर बऱ्याच काळापासून केंद्र सरकार गप्प आहे. चीन असो वा पाकिस्तान सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण हे दोन्ही घुसखोर आहेत. पहलगाम हल्ला झाला आणि त्या पूर्वीही देशाची सुरक्षा आणि अखंडतेसाठी आम्ही सर्वपक्ष एकत्र आहोत. यात कुठलाही राजकीय वाद नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.