
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज- 1 ची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित अधिकारी व अभियंत्यांशी चर्चा करून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच लवकरात लवकर रहिवाशांना घरांचा ताबा द्या अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
माझ्या वरळी मतदारसंघातील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज-१ चे काम आता पूर्णत्वास आले आहे. आज प्रकल्पस्थळी भेट देऊन ‘ई’ विंगची पाहणी केली व उपस्थित अधिकारी, अभियंत्यांशी चर्चा करून कामकाजाचा आढावा घेतला.
पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे… pic.twitter.com/cTJ2FYmhmU
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 29, 2025