शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जात आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
मराठवाड्यात कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट होते. परंतु 2 वर्षांपासून घटनाबाह्य असलेले हे निर्दयी सरकार केवळ पंचनामे करत आहेत. आर्थिक मदत मात्र दिली जात नाही. आताही निसर्गाने कोप केल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. हैराण आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायलाच हवी, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. पैठण तालुक्यातील पाचोड येथील पीक नुकसानीची पाहणी केल्यावर ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते डॉ. अंबादास दानवे व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
पाचोड शिवारातील गट नंबर 81 मधील 8 एकर कपाशी पीकांचे अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी मदनराव निर्मळ यांच्या व्यथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ऐकून घेतल्या. आजुबाजूच्या शेतकऱ्यांनीही यावेळी पीक नुकसानीची माहिती दिली. यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत शिवसेना तुमच्या मागे खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपला महाराष्ट्रातून पळवणे हेच आमचं ध्येय, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्याकडून अतिवृष्टी व पीक नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पीकांचे तत्काळ पंचनामे करावे. मी जिल्हाधिकाऱ्यांशीही बोलणार आहे, अशी सूचना केली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, तालुकाप्रमुख मनोज पेरे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख शुभम पिवळ, उपतालुकाप्रमुख ॲड् किशोर वैद्य, विधानसभा संघटक सोमनाथ जाधव, बद्रीनारायण भुमरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, कृषी अधिकारी बाळराजे मुळीक व पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी राजेश कांबळे हे उपस्थित होते.