भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले, सांडव्यातून सोडले पाणी

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाचे पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून 620 क्यूसेक्स पाणी खाली सोडण्यात आले आहे.

धरण परिसरात पाऊस सुरु असून पाण्याची पातळी वाढत आहे. भामा आसखेड धरणात पाणी आवक येत असल्याने धरणाच्या सांडव्याद्वारे 620 क्यूसेक्स पाणी दुपार दोन वाजल्यापासून सोडण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी टी.ए. आंधळे, शाखा अभियंता श्री घारे यांचेसह इतर कर्मचारी उपस्थित होते. धरण भरल्याने पंचक्रोशीसह पुणे,आळंदीच्या पिण्याचे पाण्याची चिंता दूर झाली आहे.