भारतीय जनता पक्षाचे नाव बदलून ‘भारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेड’ करावे, ‘आप’चा निशाणा

कोरोनामुळे गोव्यातील बहुतेक उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे गोव्यातील तरुणांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. व्यवसाय करण्याच्या दृष्टीने गोव्याचे देशातील रेटिंग 21 वरून 24 वर घसरले आहे, ही बाब गंभीर असून त्याला भाजप सरकार जबाबदार आहे, अशी टिका आप नेते सुरेल तिळवे यांनी केली आहे. जीआयडीसीचे अध्यक्ष तथा भाजपाचे आमदार ग्लेन टिकलो यांनी नुकतीच मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री गोव्यातील व्यवसायांना परवानगी देत नसल्यामुळे राज्यात मंदी वाढतच आहे, अशी टीका केली होती.त्यावर आपने गोव्यात भाजप सरकारच्या कारभारामुळे सगळे घटक त्रासात पडले असल्याचा आरोप केला आहे.

राज्यातील सरकार, विविध उद्योगांच्या विकासासाठी काम करीत नाही, तर जीआयडीसीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या विकासासाठी काम करत आहे आणि स्वतःची भर करत आहे. त्यामुळे भाजपने आपले नाव बदलून भारती जनता प्रायव्हेट लिमिटेड ठेवावे. या वक्तव्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की सरकार उद्योग-व्यवसायांबाबतीत  उपाययोजनांवर विचार करीत नाहीये आणि गोमंतकीयांना स्वत:च्या नशिबावर सोडत आहे, असा आरोप तिळवे यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या