आंबा घाट उद्यापासून वाहतुकीस खुला, अवजड वाहतूक मात्र बंद रहाणार

रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट उद्यापासून वाहतुकीस खुला करण्याची तयारी आणि नियोजनही झाले आहे. गेल्या तेरा दिवसांपासून आंबा घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. रस्ता खचल्याने आणि दरड पडल्याने आंबा घाटातील वाहतूक 23 जूलै पासून बंद ठेवण्यात आली होती. घाटात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 12 ठिकाणी दरड कोसळली होती. मात्र सध्या छोट्या वाहनांची वाहतूक सुरु होणार असून अवजड वाहतूक अजून काही काळ बंदच रहाणार आहे . दरम्यान आज पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे धोकादायक रस्त्याच्या ठिकाणी केलेल्या उपाययोजनांची पहाणी केली जाणार आहे .

दख्खन येथे कोसळलेली दरड फारच मोठ्या प्रमाणात होती. त्याचबरोबर या कोसळलेल्या दरडीमुळे या ठिकाणी रस्ताही नादुरुस्त झाला होता. कळकदरा येथे दरीच्या बाजूने असलेला रस्ता साईडपट्टीसह खचून दरीत कोसळला होता. त्यामुळे गेल्या 23 जूलै पासून आंबा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आंबा घाटात कोसळलेल्या सर्व ठिकाणची दरड हटवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी रस्ता नादुरूस्त झाला तोही दुरूस्त करण्यात आला आहे. कळकदरा येथे घाटातील अर्धा रस्ता खचून साईडपट्टीसह दरीत कोसळला. त्यामुळे या घाटातील वाहतूक धोकादायक बनली होती. वेळीच पोलिसांनी वाहतूक बंद केल्याने इतर काही ठिकाणी ज्या दरडी कोसळल्या त्याचा काहीही धोका झाला नाही. आता मात्र हा घाट वाहतूकीस खुला करण्याबाबतची तयारी आणि नियोजन पूर्ण झाले आहे.

सध्या लहान गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये दुचाकी तीन चाकी चार चाकी लहान गाड्या पिकअप , रुग्णवाहिका ही वाहने यांचा समावेश आहे . त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरून होऊ नये यासाठी लोखंडी कमान साधारण नऊ ते दहा फुट उंचीची उभी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक पोलीस देवरूख पोलीस स्थानक यांनी कमानी उभ्या केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी वाहतूक शाखा कर्मचारी साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे कर्मचारी या बाबत अहोरात्र मेहनत घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या