हा प्रसिद्ध अभिनेता घेणार घटस्फोट, आठ वर्षांचा संसार मोडणार?

3552

गेल्या काही वर्षात अनेक अभिनेते अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यात वादळं आली. अनेकांनी त्यांचे संसार मोडत घटस्फोट घेतले. असंच वादळ अभिनेता आमीर अली व अभिनेत्री संजिदा शेख यांच्या आयुष्यात देखील आलं असून या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.

aamir-ali-and-sanjeeda

संजीदा शेख व आमीर अली हे टीव्हीवरील एक प्रसिद्ध जोडपे आहे. या दोघांनी 2012 मध्ये निकाह केला. आठ वर्षाच्या संसारानंतर या दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे दोघे एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. लवकरच ते घटस्फोटासाठी अर्ज करतील असे समजते. मात्र त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी त्यांचे चाहते नाराज झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या