मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आंगणे कुटुंबीयांकडून 2 लाखांची मदत

451

आंगणेवाडी येथील श्री भराडी मातेचा आशीर्वाद लाभलेल्या आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई आणि आंगणे कुटुंबीय यांच्यावतीने कोरोना विरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन लाख रुपयांची मदत मंगळवारी (31 मार्च) चेकच्या स्वरूपात केली. दरम्यान, कुडाळ तालुक्यातील संविता आश्रम या सामाजिक संस्थेलाही मंडळाकडून पंचवीस हजार रूपयांचा चेक देण्यात आला आहे.

सामाजिक संकट अथवा आपत्ती काळात आंगणे कुटुंब आणि आंगणेवाडी विकास मंडळाचा मदतीचा हात नेहमीच पुढे असतो. आजही देशाची गरज ओळखून सामाजिक जाणिवेतून ही मदत दिली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे आणि सचिव मधुकर गणेश आंगणे, बाबू आंगणे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या