
पंजाबमधील जालंधरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आम आदमी पार्टीचे नेते लक्की ओबेरॉय यांची एका अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना जालंधरच्या मॉडेल टाऊन भागातील गुरुद्वारा साहिबच्या बाहेर घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.
VIDEO | Punjab: Aam Aadmi Party (AAP) leader Lucky Oberoi was shot dead outside a Gurdwara in Model Town, Jalandhar; probe underway. Visuals from the spot.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)#Punjab #Jalandhar pic.twitter.com/laqDgjTU90
— Press Trust of India (@PTI_News) February 6, 2026
गुरुद्वारातून बाहेर येताच कारमध्ये झाडल्या गोळ्या
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लक्की ओबेरॉय हे दररोजप्रमाणे मॉडेल टाऊनमधील गुरुद्वारा साहिबमध्ये दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन घेऊन ते पार्किंगमध्ये उभी असलेल्या त्यांच्या ‘थार’ कारमध्ये बसले. तितक्यात दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधुंध गोळीबार केला. त्यांच्या शरीरात सुमारे पाच गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. हल्लेखोर ‘एक्टिवा’वरून आले होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. जुन्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी का? या सर्व बाजूने पोलीस तपास करत आहेत.
लक्की ओबेरॉय हे राजकारणात नेहमी सक्रीय होते. लक्की यांच्या पत्नीने आम आदमी पार्टीच्या तिकिटावर महानगरपालिका निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. राजकीय नेत्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



























































