
अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने तब्बल 300 कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. या कर्मचारी कपातीमध्ये वरिष्ठ आंतरराष्ट्रीय घडामोडींचे स्तंभलेखक ईशान थरूर यांचाही समावेश आहे. ईशान हे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे पुत्र आहेत. पंपनी गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात असल्याने ही कर्मचारी कपात करण्यात आली आहे. कंपनीने 30 टक्के कर्मचारी कपात केली असून यामुळे न्यूजरूममधील 800 पत्रकारांपैकी 300 पत्रकारांच्या नोकऱया गेल्या आहेत. ज्या कर्मचाऱयांना कामावरून काढण्यात आले आहे, ते 10 एप्रिलपर्यंत पंपनीत राहतील. त्यांना सहा महिन्यांपर्यंत आरोग्य विम्याचा लाभ मिळत राहील, असे पंपनीने स्पष्ट केले आहे.

























































