माझे 13 ठिकाणे कुठे आहेत? किमान मला तरी सांगा आणि ताबा मिळवून द्या; ईडीच्या छाप्यावर सौरभ भारद्वाज यांची उपहासात्मक टीका

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे) नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी प्रवर्तन संचालनालयाच्या (ED) १३ ठिकाणांवर झालेल्या छाप्यांवर उपहासात्मक टीका केली आहे. आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने मंगळवारी भारद्वाज यांच्या निवासस्थानासह १३ ठिकाणांवर छापे टाकले. यानंतर बुधवारी एका आयोजित पत्रकार परिषदेत भारद्वाज यांनी ईडीवर थेट हल्ला चढवला आणि माझे 13 ठिकाणे कुठे आहेत? याची मला तरी माहिती द्या, असे म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत सौरभ भारद्वाज यांनी म्हटले, “13 ठिकाणे, जिथे ईडीने छापे टाकले आहेत, ते कुठे आहेत?” ते पुढे म्हणाले,काल माझ्या १३ ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि ते मला त्यांचा ताबा देत नाहीत. किमान मला तरी ताबा द्या, म्हणजे मी ते विकू शकेन.”

ईडीच्या छाप्याबद्दल बोलताना सौरभ भारद्वाज म्हणाले, “त्यांनी दिवसभर माझे म्हणणे ऐकले आणि माझा जबाब नोंदवला. ईडीचे सहाय्यक संचालक मयंक अरोरा यांनी माझ्या घरातील वाय-फाय वापरून माझा जबाब व्हॉट्सअॅपवर कोणाशी तरी शेअर केला. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की, माझ्या जबाबाचा काही भाग काढून टाकावा लागेल, ज्याला मी आक्षेप घेतला. म्हणूनच त्यांनी माझा जबाब घेतला नाही.”

ते म्हणाले, “ईडीने जप्त केलेल्या कागदपत्रांच्या यादीत उच्च न्यायालयाचे प्रतिज्ञापत्र होते. रात्री २ वाजताच्या सुमारास पुन्हा पंचनामा करण्यात आला, ज्यामध्ये हे प्रतिज्ञापत्र जप्ती मेमोमधून काढून टाकण्यात आले. कारण या प्रतिज्ञापत्रावरून हे सिद्ध होते की मी अधिकाऱ्यांना वारंवार, असे रुग्णालये बांधण्याचे आदेश दिले होते. परंतु उपराज्यपालांमुळे त्यांनी माझे आदेश पाळले नाहीत.”