षडयंत्र रचणाऱ्या खतरनाक व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता, थोडी तरी लाज शिल्लक असेल तर… संजय सिंह यांनी भाजपला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची दिल्ली मद्य घोटाळ्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.

”षडयंत्र रचणाऱ्या एका खतरनाक व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे आणि ती व्यक्ती नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यासोबत आणखी एक खतरनाक व्यक्ती आहे ते म्हणजे गृहमंत्री अमित शहा. या लोकांनी कट्टर प्रामाणिक असलेले व्यक्ती केजरीवाल, मनीष सिसोदीया आणि आप पक्षाला बदनाम करण्यासाठी एक भयंकर षडयंत्र रचले होते. पंतप्रधान आणि भाजपमध्ये जरा तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी कट्टर इमानदार नेत्याला बदनाम करण्यासाठी आणि त्यांना त्रास देण्यासाठी त्यांची तत्काळ माफी मागितली पाहिजे”, असे संजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.