आम आदमी पार्टीचे आमदार अमनतुल्ला खान यांना सहा तासाच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
ईडीचे अधिकारी सोमवारी सकाळी अमनतुल्ला यांच्या ओखला परिसरातील घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी अमनतुल्ला यांची सहा तास चौकशी केली. अमनतुल्ला हे दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात घोटाळा केल्याचा आरोप ईडीने केला आहे.
ईडीने धाड टाकल्यानंतर अमनतुल्ला यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली होती. ”ईडीचे अधिकारी मला अटक करायला माझ्या घरी पोहोचले आहेत”, असे अमनतुल्ला यांनी ट्विट केलेले. ईडीच्या धाडीनंतर अमनतुल्ला यांच्या घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.