
बहिणीच्या लग्नासाठी पैशाची गरज असल्याने मालकाचा पिकअप चोरी करणाऱ्याला आरे पोलिसांनी अटक केली. ब्रजेशकुमार रामगोपाल ऊर्फ टायगर असे त्याचे नाव आहे.
तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांचा डेकोरेशनचा धंदा आहे. गेल्या वर्षी त्यांच्या भावाने व्यवसायासाठी एक पिकअप खरेदी केला होता. रात्री तो पिकअप हा आरे कॉलनी येथे पार्क करत होते. 17 जानेवारीला त्यांनी आरे कॉलनी येथे पिकअप पार्क केला. दुसऱ्या दिवशी ते घटनास्थळी आले. त्यांना पिकअप जागेवर दिसला नाही. घडल्याप्रकरणी त्यांनी आरे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.
वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे, उपनिरीक्षक सचिन पांचाळ, नागरे, पाटील, बरकडे, पवार आदींच्या पथकाने परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून ब्रजेशकुमारला ताब्यात घेतले.
गोवंडी गोळीबार प्रकरण; प्रेमसंबंधातून तरुणीची हत्या
गोवंडी येथे मंगळवारी दुपारी तरुणीची गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. प्रेमसंबंधातून हे हत्याकांड झाल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.






























































