आसाममध्ये हिंसाचार सुरुच, 22 डिसेंबरपर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार

1030

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये गेल्या दोन दिवसांपासून आगडोंब उसळला असून शुक्रवारी देखील तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे आसाममधील शाळा कॉलेज 22 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच आणखी 48 तास इंटरनेट सेवा खंडीत ठेवण्यात येणार आहे.

आसाम, त्रिपुरामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत आसाममध्ये झालेल्या 31 ट्रेन व अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी आसाममध्ये अडकूनराहिले आहेत. तसेच अनेक भागात संचारबंदी असल्याने सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान तसेच बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाले. मात्र देशभरात या विधेयकाला कडाडून विरोध होत आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये हा विरोध अधिक तीव्र आहे. नॉर्थ ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात 30 संघटना सहभागी झाल्या आहेत. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल तसेच मेघालय या राज्यांमध्ये आंदोलनामुळे जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या