‘आशां’ना मानधनवाढ; रत्नागिरीत विजयी मेळावा

739

आशा कर्मचार्‍यांना शासनाने 2 हजार रुपयांची मानधनवाढ दिल्याबददल महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा व गटप्रवर्तक संघटना आयटकने रत्नागिरीतील शामराव पेजे सभागृहात मंगळवारी विजयी मेळावा घेतला. आशा कर्मचार्‍यांना मानधनवाढ मिळावी यासाठी आशा व गटप्रवर्तक संघटना आंदोलन करत होती. राज्य शासनाने आशा कर्मचाऱ्यांना 2 हजार रुपयांची मानधनवाढ देण्याचे परिपत्रक जारी केले आहे. अनेक महिने आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा विजय झाला असल्याने विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शंकर पुजारी, सुमन पुजारी, विद्या कांबळे , प्रतिक्षा खेडकर, पल्लवी पारकर, संजीवनी तेवडेकर, अंकिंता शिंदे-बागवान, विद्या भालेकर, प्रियांका डंबे, ऋतुजा गोसावी, सुजाता पालांडे, अनुष्का गुरव यांनी मार्गर्दन केले. आशा कर्मचार्‍यांना 2 हजार रुपयांची मानधनवाढ मिळाली असली तरी गटप्रवर्तक महिलांना मानधनवाढ मिळाली नाही. त्यांना 3 हजार रुपये मानधनवाढ मिळावी, अशी मागणी असल्याचे संघटनेचे शंकर पुजारी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या