आयुष्मानने खरेदी केले स्वप्नातील घर, किंमत ऐकून व्हाल थक्क!

1792

बाला, विकी डोनर, गुलाबो सीताबो आदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराना याने नुकतेच आपल्या कुटुंबीयांसाठी स्वप्नातील घर खरेदी केले आहे. या घरासाठी त्याने तब्बल 9 कोटी रुपये मोजल्याची चर्चा आहे.

आयुष्मानचे नवीन घर मुंबईत नाही तर चंदिगढच्या पंचकुला भागातील सॅटेलाईट टाऊन या ठिकाणी आहे. शहरातील गर्दीपासून दूर अतिशय उच्चभ्रू ठिकाणी हे घर आहे. आपल्या नव्या घराविषयी आयुष्मान म्हणाला, खुराना कुटुंबीयांना आता त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. संपूर्ण कुटुंबीयांनी हे घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या या नव्या पत्त्यावर खूप साऱया नव्या आठवणीं तयार करण्याची आम्ही वाट पाहत आहोत’

नव्या घराच्या नोंदणीसाठी आयुष्मान आणि त्याची पत्नी ताहिरा नुकतेच तहसील कार्यालयात पोहोचले होते. पंचकुला येथील सेक्टर 6 मध्ये त्याचे घर आहे. 870 स्क्वेअर मीटर जागेवर वसलेल्या घराची अंदाजे किंमत 9 कोटी आहे, अशी माहिती कार्यालयातील अधिकाऱयांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या