नगरमधून प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे अपहरण, शहरात खळबळ

2946
karim-bhai-hundekari

नगर येथील प्रसिद्ध उद्योजक व हुंडेकरी मोटर्स संचालक करीम भाई हुंडेकरी यांचे अज्ञात व्यक्तींकडून सोमवारी पहाटे अपहरण झाल्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोलिसांशी संपर्क केला असता आम्ही नंतर माहिती देऊ, असे सांगितले आहे.

नगर जिल्ह्यामध्ये हुंडेकरी मोटर्स शोरूम नावाचे टाटा मोटर्सचे शोरूम आहे. त्याच्या नगर शहरासह जिल्ह्यात अनेक शाखा आहेत. करीम भाई हुंडेकरी हे या शोरूमचे संचालक आहेत. आज पहाटे ते नमाज पडण्यासाठी नेहमीप्रमाणे जात होते. पाठीमागून येणाऱ्या गाडीने त्यांना अडवले व त्या गाडीमध्ये बसण्यास सांगितले व यामध्ये चांगलीच झटापट झाली व त्यांना त्या गाडीत घालून तेथून बाहेर नेण्यात आले, अशी प्राथमिक माहिती समजली आहे. करीम भाई यांना घरी येण्यास वेळ का लागला म्हणून घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांना अशी घटना झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

तसेच त्यांचे पुत्र वसीम हुंडेकरी हेसुद्धा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. या रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी सुरू करण्यात आली असून नेमका हा प्रकार कशामुळे झाला त्याची अद्यापपर्यंत माहिती मिळालेली नाही. यासंदर्भात पोलिसांशी संपर्क केला असता आम्ही आपल्याला नंतर माहिती देऊन एवढेच सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या