
हिंदुस्थानने पाकिस्तानला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणजे केवळ सैन्यदलाकडून करण्यात आलेली कारवाई नाही तर हा देशाच्या अस्मितेसाठी, सुरक्षा आणि आत्मगौरवासाठी प्रचंड शंखनाद असून निर्णायक बदला आहे, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे प्रवत्ते अभय वर्तक यांनी दिली आहे. हिंदुस्थानी लष्कराची ही कारवाई प्रत्येक हिंदुस्थानीसाठी आनंद आणि अभिमानाचा विषय आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सनातन संस्था या निर्णायक कारवाईचे स्वागत करते असेही ते म्हणाले.