बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या वीज ग्राहकांसाठी महावितरणकडून 1 सप्टेंबरपासून अभय योजना राबविण्यात येणार आहे. मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत अभय योजनेत देण्यात येणार आहे.