महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : अभिजित कटके सलग  दुसर्‍यांदा फायनलमध्ये,  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना 

पुण्याच्या अभिजित कटके याने शनिवारी सोलापूरच्या रवींद्र शेडगे याला चीतपट करीत येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रातील मानाच्या कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. तसेच गादी विभागातून सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरीत धडक मारली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा तालीम संघाच्या वतीने तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अभिजित कटके हा गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरीचा विजेता असून सोलापूरच्या रवींद्र शेंडगे यांच्यासोबत त्याची गादी गटातील अंतिम सामन्याची लढत झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत अभिजित कटके याने रवींद्र शेंडगे याला कुस्तीच्या रिंगणात पराभूत महाराष्ट्र केसरीची गदा आपल्याकडेच राखण्याकडे कूच केली.