
येत्या 30 मे आणि 6 जूनला इंग्लंड दौऱ्यात इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध होणाऱ्या दोन चारदिवसीय प्रथम श्रेणी सामन्यांसाठी हिंदुस्थानी ‘अ’ संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरनकडे सोपविण्यात आले आहे. या संघाला मुंबईची ताकद लाभली असून यशस्वी जैसवाल, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, सरफराज खान आणि तुषार देशपांडे या पाच मुंबईकरांची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यात हिंदुस्थान ‘अ’ संघ पहिला सामना केंटबरीला खेळेल तर दुसरा सामना नॉर्थम्पटनला होईल. तसेच 13 ते 16 जूनदरम्यान हिंदुस्थानचा संघ बॅकनहमलाही एक सामना खेळणार आहे.
हिंदुस्थान ‘अ’ संघ
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैसवाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), नितीशकुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (यष्टिरक्षक), मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाशदीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, शुभमन गिल, साई सुदर्शन.