
2019 मध्ये पाकिस्तानचे फायटर जेट एफ-16 हे विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांनी आता नवी इनिंग सुरू केली आहे. ते आता गोवा येथील एका खासगी विमान कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत झाले आहेत. पाकिस्तानचे फायटर विमान पाडल्यानंतर ते देशभरात चर्चेत आले होते. त्यांच्या या पराक्रमानंतर त्यांना ‘वीरचक्र’ देऊनही गौरवण्यात आले होते.
फ्लाय 91 या विमान कंपनीत अभिनंदन वर्धमान हे व्यावसायिक पायलट म्हणून रुजू झाले आहेत. 2019 च्या एअर स्ट्राईक दरम्यान अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानने ताब्यातही घेतले होते. पण त्यानंतर केंद्र सरकारने शिष्टाई केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते. वर्धमान यांना 2021 मध्ये ‘वीरचक्र’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.



























































