ठेवी सुरक्षित,अभ्युदय बँकेचा दावा

अभ्युदय बँक सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असून तिची आर्थिक स्थिती उत्तम आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत गेल्या काही दिवसांत व्हॉट्स अॅपवर खोडसाळ संदेश फिरविले जात आहेत. या अशा खोट्या अफवा पसरविणाऱयांविरोधात बँकेने पोलीसात तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई सुरू आहे. ग्राहकांनी अशा अफवांकर दुलर्क्ष करावे, ग्राहकांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे बँकेने म्हटले आहे.

काही उपद्रवी व्यक्ती सोशल माध्यमावर बँकेविषयी बिनबुडाची व खोटी माहिती प्रसारित करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. बँकेने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. अशा खोटय़ा अफवा पसरविणाऱयांविरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली असून पोलीसांनी आपला तपास सुरू केला आहे. ग्राहकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी अपप्रचाराकडे दुर्लक्ष करावे असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रेमनाथ एस.सालियन यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या