क्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला!

2191

क्रिकेट हा विक्रमांचा खेळ असून प्रत्येक सामना आणि चेंडूमागे नवीन विक्रमाची नोंद होत असते. रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि श्रीलंका संघात झालेल्या कसोटी लढतीतही एका नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. या कसोटीचे तीन दिवस पावसाने वाया गेले मात्र शेवटच्या दिवशी विक्रमाची नोंद झाली. पाकिस्तानचा फलंदाज अबीद अली याने हा विश्वविक्रम केला आहे.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 308 धावांवर आपला डाव घोषित केला. लंकेकडून धनंजय डीसिल्व्हाने सर्वाधिक 102 धावांची नाबाद खेळी केली. श्रीलंकेच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानचा सलामीवीर अबीद अली याने शतकी खेळी केली. अबीद अली याचा हा पहिलात आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता आणि या लढतीत शतक ठोकत त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली.

श्रीलंकने डाव घोषित केल्यानंतर पाकिस्तानच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शाह मसूद शून्यावर बाद झाला. यानंतर अबीद अली (109) आणि बाबर आझम (102) यांनी डावाची सूत्र हाती घेत तुफानी फलंदाजी केली. अबीद अली याने शतक झळकावले आणि विश्वविक्रम नोंदवला.

कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या लढतीत शतक झळकावण्याचा पराक्रम अबीद अली याने केला आहे. असा पराक्रम आजपर्यंतच्या क्रिकेट इतिहासामध्ये कोणालाही जमलेला नाही. याआधी त्याने 2019 ला एक दिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्घ पदार्पणाच्या लढतीत 112 धावांची खेळी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या