…तर मध्य रेल्वेवर वीकेण्डलाही धावणार एसी लोकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
AC local

मध्य रेल्वेवर आणखी एक नवीन एसी लोकल दाखल झाली आहे. मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल सध्या ठाणे ते वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर सोमवार ते शुक्रवार चालवण्यात येत आहे. दुसरी एसी लोकल दाखल झाल्याने तिला पर्यायी लोकल म्हणून वापरली जाणार आहे. मध्य रेल्वेवर तिसरी एसी लोकल दाखल झाल्यावर शनिवारी आणि रविवारी एसी लोकल चालवणे शक्य होणार आहे.

मध्य रेल्वेवर 31 जानेवारीपासून ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकलच्या 16 फेऱ्या होत आहेत. दोन ते तीन दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवर आणखी एक एसी लोकल दाखल झाली आहे. अशा एकूण 12 एसी लोकल मुंबईत येणार असून त्यातील सहा एसी लोकल पश्चिम रेल्वेला तर सहा एसी लोकल मध्य रेल्वेला मिळणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर पाच एसी लोकल दाखल झाल्याने आता पश्चिम रेल्वेवर शनिवार आणि रविवारदेखील एसी लोकलची सेवा दिली जात आहे.