नंदूरबारमध्ये जीप दरीत कोसळली; 5 मजूरांचा मृत्यू, 14 जण जखमी

नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ खडकी घाटात शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जीप दरीत कोळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 5 मजूरांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जीप दरीत 100 ते 150 फूट खाली कोसळल्याने जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मृतांमध्ये एका मुलीचा आणि तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतांच्या दुर्गम भागातील खडकी गावातून एका जीपमधून सुमारे 30 आदिवासी मजूर प्रवास करत होते. रोजगाराच्या शोधात या भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते.

हे मजूर मजुरीसाठी गुजरातमध्ये जात होते. त्यावेळी तोरणमाळचा घाट चढताना खडकी गावाजवळ जीप अचानक दरीत कोसळली. स्थानिकांनी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. तसेच घाट चढत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या