गंगाखेडजवळ ट्रॉलीला दुचाकी धडकली; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री परळी रस्त्यावरील वडगाव पाटीजवळ घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा भाऊ जखमी झाला आहे. विठ्ठल गणपत लांडगे असे मृताचे नाव आहे.

सोनपेठ तालुक्यातील नैकोटा येथील विठ्ठल गणपत लांडगे ( वय 32) व त्यांचा भाऊ अतुल गणपत लांडगे ( वय 26) हे दोघे भाऊ दुचाकीवरून रात्री गंगाखेडकडे येत होते. गंगाखेड-परळी रस्त्यावरील वडगाव पाटीजवळ एक ट्रॉली अपघातग्रस्त झाली होती. मध्यरात्री अंधारात त्यांना ट्रॉली दिसली नाही.त्यामुळे ते ट्रॉलीवर धडकले. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर अतुल गणपत लांडगे गंभीर जखमी आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टी.टी. शिंदे, जमादार बाबुराव घरजाळे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या अतुल लांडगे यांना पोलिसांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृत विठ्ठल लांडगेचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या