मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर पलटी, वाहतूक विस्कळीत

43

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावर एक कंटेनर पलटी झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन्ही बाजूला गाड्यांच्या रांगा लागल्या असून कंटेनर हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गवरून मोठ्या प्रमाणावर कंटनेरची ये-जा सुरू असते. मंगळवारी सकाळी एक कंटेनर पेणजवळील रामवाडी पुलावर पलटी झाला. यामुळे दोन्ही मार्गाची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे. प्रशासनाने कंटनेर हटवण्याचे काम सुरू केली असून वाहतूक सुरळीत होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या