अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्या आरोपीला अटक

पेण शहरातील फणसडोंगरी येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला पेण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयात हजर केले असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पेण शहरातील फणसडोंगरी येथे राहणारी 16 वर्षीय मुलीला याच परिसरात राहणाऱ्या आनंद गणपत जाधव (27) या आरोपीने 23 जानेवारीला फूस लावून पळवून नेले होते. मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी आनंद जाधव याने आपला मोबाईल बंद केला होता.

महिला पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे यांनी मोठ्या शिताफीने तपास करीत आरोपीला चाकण, पुणे येथील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले. याबाबत आरोपी आनंद गणपत शिंदे याच्या विरोधात भा.द. वि. कलम 363,376 व पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या