
अमेरिकेतील टेक्सासमध्ये 23 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थी चंद्रशेखर पोलची हत्या करणाऱ्या आरोपीला अमेरिकन पोलिसांनी अखेर अटक केली आहे. रिचर्ड फ्लोरेज असे आरोपीचे नाव आहे. चंद्रशेखर पोल हा तेलंगणाच्या हैदराबादचा रहिवासी आहे. तो मास्टर डिग्रीसाठी तो अमेरिकेत गेला होता.