मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला करणारा आरोपी तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्धचे राणाचे अपील अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला हिंदुस्थानात पाठवले जाऊ शकते. सुनावणी होईपर्यंत आपल्याला हिंदुस्थानच्या ताब्यात देऊ नये, अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली होती. परंतु कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली.