या अॅसिड हल्ला पीडितेच्या जीवनावर आधारित आहे दीपिकाचा ‘छपाक’, पाहा फोटो

दीपिकाचा अॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या जीवनावर आगामी चित्रपट छपाकचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या चित्रपटातील अॅसिड हल्ल्यातील पीडितेचे दुख बघून काळीज पिळवटून जाते. खरंच ज्याच्या आयुष्यात ही घटना घडली असेल तिचं काय झालं असेल असा विचार ट्रेलर पाहताना प्रत्येकाच्याच मनात आला असणार. दीपिकाच्या छपाकची कथा ही अॅसिड हल्ल्यातील पीडित तरुणी लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आहे.

laxmi-agarwal-1

नवी दिल्लीतल्या सामान्य कुटुंबात जन्मलेली लक्ष्मी ही अवघ्या 15 वर्षांची असताना तिच्यावर अॅसिड हल्ला झाला होता. लक्ष्मी हिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या नदीम खान याने तिच्यावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात तिचा संपूर्ण चेहरा होरपळला होता.

laxmi-agarwal-4

मात्र या हल्ल्याने लक्ष्मी खचली नाही तिने सर्वोच्च न्यायालयात तिचा खटला लढला व तिच्या गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा दिली. अॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी मोहिम सुरू केली.

laxmi-agarwal-3

अॅसिडच्या विक्रीवर बंदी आणण्यासाठी तिने मोहीम राबविली होती. देशभरातून तिच्या याचिकेवर 27हजार लोकांनी सह्या केल्या होत्या. तिच्या मोहिमेनंतर सर्वोच्च न्यायालयाने अॅसिड विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

laxmi-agarwal-2

अॅसिडच्या विक्रीवर बंदी आणण्यासाठी तिने राबविलेल्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती. तिला इंटरनॅशनल वुमेन एमपॉवरमेंट अवॉर्ड 2019 हा पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच मिशेल ओबामा यांच्या हस्ते 2014 साली इंटरनॅशनल वुमन करेज हा पुरस्कार मिळाला होता.

laxmi-pihu-1

2015 मध्ये लक्ष्मीने अॅसिड हल्ल्यातील पीडितेसाठी मोहिम राबविणाऱ्या आलोक दीक्षितसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्या दोघांना पिहू नावाची मुलगी देखील आहे.

deepika-and-laxmi

लक्ष्मीच्या अशा खडतर जीवनावर दिग्दर्शिक मेघना गुलजार यांनी छपाक हा चित्रपट तयार केला असू हा चित्रपट 20 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणने लक्ष्मीची भूमिका साकारली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या