
बॉलीवूड अभिनेता बाबिल खानने चित्रपटांमधून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली आहे. अलीकडेच त्याने रडत रडत चित्रपटसृष्टीला शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्याच्या टीमने सारवासारव केली. मात्र यावर चित्रपट निर्माते साई राजेश यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी बाबिलला फटकारले आणि दोघांमध्ये वाद झाला. आता बाबिलने चित्रपटातून ब्रेक घेतला असून साई राजेश यांचा चित्रपटही त्याने सोडला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत बाबिलने ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले. बाबिल म्हणाला की, धाडस, आवड आणि एकमेकांमधील आदराने राजेश सर व मी या जादुई प्रवासाला सुरुवात केली. दुर्दैवाने गोष्टी ठरल्याप्रमाणे घडल्या नाहीत. मी थोडा वेळ ब्रेक घेत आहे.