दीपिका पदुकोणच्या वडिलांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

प्रकाश पदुकोण हे सुप्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्यांचे वय 65 असून त्यांन कोरोनाची लागण झाला आहे. त्यांना बंगळूरूच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश पदुकोण यांची प्रकृती स्थिर असून लवकरच ते बरे होतील असे डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच पुढील 2-3 दिवसां त्यांना डिस्चार्जही मिळेल असे सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या