बॉलिवूड अभिनेता गोविंदा स्वत:चीच रिवॉल्वर साफ करताना चुकून गोळी सुटल्याने जखमी झाला आहे. गोविंदाच्या पायात गोळी शिरली असून त्याला उपचारासाठी मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी गोविंदा आपली सर्व्हिस रिवॉल्वर साफ करत असताना चुकून मिसफायर झाले. रिवॉल्वहरमधून सुटलेली गोळी थेट गोविंदाच्या पायात शिरली. त्यानंतर त्याला तातडीने क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोविंदावर सध्या उपचार सुरू आहेत. जुहू पोलिसांनी गोविंदाची बंदुकही जप्त केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Actor and Shiv Sena leader Govinda has been taken to the nearest hospital after he was accidentally shot in the leg by his own revolver this morning, says a senior Mumbai Police official
More details awaited.
(file pic) pic.twitter.com/SBqnMcDgoA
— ANI (@ANI) October 1, 2024
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे 4.45 वाजताच्या सुमारास घडली. बाहेर जाण्याची तयारी करत असताना गोविंदा आपली सर्व्हिस रिवॉल्वर साफ करत होता. याच दरम्यान चुकून त्याच्याकडून गोळी चालली गेली. चुकून सुटलेली गोळी त्याच्या गुडघ्याजवळ लागली असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
गोविंदाचा मॅनजर शशि सिन्हाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, गोविंदा कोलकाताला जाण्याची तयारी करत होता. लायसन्सची रिवॉल्वर कपबोर्डमध्ये ठेवत असतानाच त्याच्या हातातून रिवॉल्वर सुटली आणि खाली पडली. त्यानंतर त्यातून गोळी सुटली. ही गोळी गोविंदाच्या पायाला लागली आणि तो जखमी झाला.
#UPDATE | Actor and Shiv Sena leader Govinda was getting ready to leave for Kolkata. He was keeping his licensed revolver in the cupboard when it fell from his hand and a bullet got fired which hit his leg. The doctor has removed the bullet and his condition is fine. He is in the… https://t.co/iBtEcngdoA
— ANI (@ANI) October 1, 2024